राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथी

11

१७ जून १६७४, बुधवार, मध्यरात्र

जिजाबाई साहेब यांचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे निधन. आनंदनाम संवत्सरात ज्येष्ठाच्या वद्य नवमीला आऊसाहेबांची प्राणज्योत मालवली. थोरल्या महाराज स्वामींचे मातृछत्र उडाले. राजा पोरका झाला. दिशा शुन्य झाल्या. आधार संपला. अंधार उरला. फक्त घनदाट अंधार. आता महाराजांना “बाळ” म्हणणारे जगात कोणीही उरले नाही. महाराज एकाएकी प्रौढ झाले.