मातृशक्तीचा जागर- रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घर

नागपूर, ११ फेब्रुवारी २०२४ : रोडमार्क फॉउन्डेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाद्वारे 12 फेब्रुवारी सोमवारी दुपारी 12 वाजता सुरेशभट सभागृहात उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमा अंतर्गत मानवी चुकीमुळे होणाऱ्या वाढते रस्ते अपघतांवर नियंत्रण आणण्याकरिता जानेवारी ते डिसेंबर 2024 पर्यंत विशेष प्रयत्न करणार असून, विविध प्रकारे नकारात्मक मानसिकतेने बेधडक वाहन चालविणारे, मद्यपान करून वाहन चालविणारे, सारखे विविध प्रकारे होणाऱ्या रस्ते अपघात टाळण्याकरिता सकारात्मक वाहन चालवून रस्ते अपघातमुक्त जीवन जगता यावे ही संकल्पना समाजात रुजविण्याकरिता लोकसहभागातून लोकचळवळ उभी व्हावी याकरिता अवगत करणे, रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला या अभियाना अंतर्गत मातृशक्ती चा जागर रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घर, एक लोकचळवळ रोडमार्क फाऊंडेशन ने सुरू केली आहे.

या कार्यमाचे उद्घाटन संस्कार भारती नागपूरच्या शहर अध्यक्षा आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. वरील कार्यक्रमाला जास्तीत जास्त मातृशक्तींनी उपस्थितीत राहावे. असे आवाहन रोडमार्कचे संस्थापक अध्यक्ष राजु वाघ यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी – नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा