Moto Edge 20, Edge 20 Fusion भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

पुणे, १८ ऑगस्ट २०२१: चीनी स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने भारतात मोटो एज 20 आणि मोटो एज 20 फ्यूजन लॉन्च केले आहे. यांची किंमत २१,४९९ रुपयांपासून सुरू होत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मोटोरोलाने भारतात प्रो मॉडेल लाँच केलेले नाही.  हे स्मार्टफोन गेल्या महिन्यात युरोपियन बाजारात लाँच करण्यात आले होते.  मोटो एज 20 फ्यूजन हे खरे तर मोटो एज 20 लाइटचे नाव आहे.  हे नाव बदलूनच भारतात हा मोबाईल लाँच करण्यात आला आहे.
 मोटो एज 20 ची किंमत २९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.  त्याचे एकच वेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे ज्यामध्ये 8GB रॅम आहे.  मोटो एज २० फ्यूजनबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत २१,४९९ रुपये आहे, तर 8GB व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे.
 Moto Edge 20 दोन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे.  मोटो एज 20 फ्यूजन इलेक्ट्रिक ग्रेफाइट आणि सायबर टील व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.  मोटो एज 20 ची विक्री २४ ऑगस्टपासून सुरू होईल, तर मोटो एज 20 फ्यूजनची विक्री फ्लिपकार्टवर २७ ऑगस्टपासून सुरू होईल.
 मोटो एज 20ची स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
 मोटो एज 20 मध्ये ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे आणि 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.  कंपनी त्याला भारताचा सर्वात पातळ 5G स्मार्टफोन देखील म्हणत आहे.  या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ प्रोसेसर देण्यात आला आहे.
 मोटो एज 20 मध्ये १०८ मेगापिक्सेलचा प्राइमरी लेन्स देण्यात आली आहे.  सोबत टेलीफोटो लेन्स देखील आहे.  एक मॅक्रो लेन्स आणि एक अल्ट्रा वाइड लेन्स आहे.  सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.  मोटो एज 20 मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे आणि 30W चार्जिंग सपोर्ट करते.  १० मिनिट चार्ज करून ८ तास चालवता येते असा कंपनीचा दावा आहे.
 मोटो एज 20 फ्यूजनची वैशिष्ट्ये
 मोटो एज 20 फ्यूजनमध्ये ६.७ इंचाचा OLED डिस्प्ले आहे.  या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 800U प्रोसेसर देण्यात आला आहे.  या फोनमध्ये 6GB आणि 8GB रॅम व्हेरिएंट देण्यात आले आहेत.
 मोटो एज 20 फ्यूजनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे.  याशिवाय, ८-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे.  सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.  या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे.  यासोबत 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा