लोणी काळभोर, ११ सप्टेंबर २०२०: लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट झालेला असून त्यांना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. परंतु, त्यांना वेळीच प्रतिबंध व्हावा व मोटारसायकल चोरट्याचा बंदोबस्त व्हावा यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व त्यांची टीम काही दिवसापासून मोटरसायकल चोरांच्या तपासावर होती.
त्या दृष्टीने त्यांना दिनांक ०२ सप्टेंबर २०२० रोजी गुप्त बातमी मिळाली की, अंबरनाथ मंदिराजवळ लोणी काळभोर येथे राहणारे कार्तिक भुजबळ, विवेक तेलंग यांनी काही मोटारसायकली चोरले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी त्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर (लोणी काळभोर पोलिस स्टेशन)१ यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिक भुजबळ, विवेक तेलंग यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडे चोरलेल्या मोटरसायकल बाबत चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांना पोलीस खाक्या दाखवताच दोघांनी एकूण ५ मोटारसायकली चोरल्याची कबुली देऊन त्यांच्याकडून पोलिसांनी २ बुलेट, १ अप्पाची बाईक व २ स्प्लेंडर अशा मोटर सायकल मुद्देमाल जप्त करून लोणी काळभोर पोलिस ठाणे व हडपसर पोलीस ठाण्याकडे गुन्हे उघड झाले आहेत.
तसेच मा. सो. अपर पोलीस अधीक्षक बारामती व अतिरिक्त कार्यभार पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा. विवेक पाटील, सो.अपर पोलीस अधीक्षक पुणे, मा. डॉ. सई भोरे पाटील सो. उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक विजय गाले, पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास पारखे, सागर कडू, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे व पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशन करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे