बारामती, दि. २१ जुलै २०२०: बारामती तालुका पोलिस स्टेशनने चांगलीं कामगिरी करत २०१३ सकाळ पासून चोरीस गेलेल्या ३१ मोटार सायकल कर्नाटक राज्यातून जप्त केल्या आहेत. या मोटर सायकल चोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मागील काही महिन्यांपासून बारामती शहर एमआयडीसीसह आजूबाजूच्या परिसरातून मोटार सायकल चोरीचे प्रमाण खुप वाढले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे तालुका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरुन गोपनीयरित्या बारामती तालुक्यातील मोटार सायकल चोरणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर लक्ष ठेऊन हालचालींवर लक्ष ठेवले तसेच तांत्रिक मदत घेवून संशयीत म्हणून अजित दशरथ आगरकर (रा.बेलवाडी, ता.इंदापूर, जि.पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
आगरकर याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने बारामती शहर व परिसरातून मोटार सायकल चोरून त्या कर्नाटक राज्यातील गावात विक्री केल्या असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारावरून गुन्हे पथकाच्या टीमने कर्नाटक राज्यातून गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेल्या पंधरा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या ३१ मोटरसायकल हस्तगत केल्या.
जप्त केलेल्या मोटार सायकल बारामती तालुका पोलीस स्टेशन, बारामती शहर पोलीस स्टेशन, वालंचदनगर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेल्या होत्या. आरोपी हा मोटार सायकल चोरीत सराईत असून तो हॅण्डल लाॅक तोडून व बनावट चावीचा वापर करून मोटार सायकल चोरत होता व त्या मोटार सायकल कर्नाटक राज्यात वेगवेळया विक्री करत होता. बारामती तालुका पोलिसांच्या या कामगिरीवर खुश होऊन. पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा) यांनी ३०,००० रुपयाचे बक्षीस संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जाहीर केले आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,सहा.फौ.दिलीप सोनवणे, पोलीस काॅस्टेंबल नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, होमगार्ड सचिन गायकवाड, शेखर आदलिंग,पोलीस मित्र मच्छिंद्र करे हे या कारवाई मध्ये सहभागी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव