भाजपाकडून महिलांवरील वाढते अत्याचार विरोधात आंदोलन

पुणे, १२ ऑक्टोबर २०२०: आज भारतीय जनता पार्टी कडून संपूर्ण राज्यभर महा आघाडी सरकारच्या विरोधात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात महाआघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलने करण्यात आली.

महाराष्ट्रात covid-19 मध्ये मुलींवर अत्याचार केला जातोय. महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत चालले आहेत, त्याकडे पहिले महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने लक्ष द्यावे नाहीतर खुर्ची खाली करावी अशी तीव्र भुमिका यावेळी भारतीय जनता पार्टी कडून मांडण्यात आली. भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर तर्फे आज सकाळी गुडलक चौक, डेक्कन येथे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), योगेश बाचल ( उपाध्यक्ष पुणे शहर ), मंगला ढेरे ( सचिव पुणे शहर ), सुनील माने ( सचिव पुणे शहर ), नगरसेवक नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, राजेश्री काळे, स्वाती लोकेंडे व आदित्य माळव, आणि रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), गणेश बगाडे (सरचिटणीस शिवाजीनगर), प्रतुल जागडे (सरचिटणीस शिवाजीनगर),आनंद छाजेड (सरचिटणीस शिवाजीनगर), डॉ.अपर्णाताई गोसावी ( अध्यक्ष शिवाजीनगर महिला आघाडी) व सर्व पदाधिकारी, पक्ष कार्यकर्त आणि नागरिक सहभागी झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा