पुणे, १० सप्टेंबर २०२०: मागील तीन महिन्यांपासून MIT WPU चे विद्यार्थी महाविद्यालयीन प्रशासनापर्यंत विविध समस्यांबाबत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रतिसाद देत नाही. या प्रकरणात हस्तक्षेप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांची समस्या घेऊन दिनांक ०६/०७/२०२० आणि दिनांक १३/०८/२०२० रोजी महाविद्यालयाला पत्रे दिली होती. परंतु अद्यापही महाविद्यालयाने त्यावर उत्तर दिले नाही. २५/०८/२०२० रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या कुलगुरुंची भेट घेतली आणि मागण्यांबाबत उत्तर देण्यासाठी महाविद्यालयाला तीन दिवसांची मुदत दिली व महाविद्यालय तसे करण्यास अपयशी ठरले तर निषेध दर्शविला जाईल असेही कळवण्यात आले होते, तरीही महाविद्यालयाने त्यावर उत्तर दिले नाही.
ह्यावर १०/०९/२०२० रोजी अभाविपने पोलिसांना कळवून संविधानिक रित्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण भ्रष्ट, बेजबाबदार आणि घाबरलेल्या सरकारने पोलिसांना कोणत्याही प्रकारचा निषेध होऊ देऊ नये म्हणून आदेश दिले. त्यामुळे अभाविपने महाविद्यालयाचे रेजिस्ट्रार प्रशांत दवे सरांना भेटण्याचा आग्रह केला. या प्रकरणातही महाविद्यालयाने बैठक रेजिस्ट्रार ऑफिस मध्ये न करता महाविद्यालयाच्या दक्षता पोलिसांच्या केबिनमध्ये बैठकीची व्यवस्था केली, त्यात अभाविप कार्यकर्त्यांना गुन्हेगार म्हणून दर्शविले गेले.
शुल्काचे ३०-४० % कपात
महाविद्यालय बंद असल्याने विकास शुल्क फी मध्ये समाविष्ट नाही केला पाहिजे,वीज वापरत नाही तर वीज ची फी नाही,एकंदरीत देखभाल फी नाही घ्यावी इ. IST (आंतरराष्ट्रीय अभ्यास टूर) साठी निष्कर्ष शक्य तितक्या लवकर दिला पाहिजे केले पाहिजे. महाविद्यालयने कोणत्याही विद्यार्थ्यावर व पालकांवर फी भरण्यासाठी दबाव नाही आणला पाहिजे. विद्यापीठाने शुल्क भरण्यासाठी ४ टप्पे दिले पाहिजे. महाविद्यालयाने प्रवेश फी एकूण शुल्कापैकी केवळ १५ % घेतली पाहिजे. बॅकलॉग परीक्षा घेणे आवश्यक आहे. शक्य तितक्या लवकर घेतली पाहिजे. (बरेच विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, प्लेसमेंटसाठी बॅकलॉग परीक्षा पास होणं गरजेचं आहे) अशा मागण्या अभाविपने बैठकीत केल्या आहेत.
महाविद्यालयाच्या रेजिस्ट्रार ने ७ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात उत्तर देण्याची हमी दिली आहे. या बैठकीत MIT WPU चे रेजिस्ट्रार श्री प्रशांत दवे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगर संघटनमंत्री शुभम जी अग्रवाल, पुणे महानगर सहमंत्री प्रसाद जी आठवले, अ. भा . वि. प. MIT SOM चे अध्यक्ष विशाल कणसे आणि अन्य कार्यकर्ते, पोलिस निरीक्षक पोलिसांसह उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड