माढा १७ ऑक्टोबर २०२० : टेंभुर्णी मध्ये अतिवृष्टी झाली या ठिकाणी अनेक नागरीकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले.सिद्धार्थ नगर मध्ये उद्धव खरात यांचे पाण्यात बुडून मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टींची कल्पना सर्वांना होती. पंरतु त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी किंवा प्रतिनिधींनी भेट दिली नाही. पंरतू आज सकाळी माढा तालुक्यातील या अतिवृष्टीची संपुर्ण माहिती भारतीय जनता पार्टी माढा तालुका अध्यक्ष मा.श्री. योगेश जी (बाबाराजे) बोबडे यांनी माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह निबांळकर यांना फोन करून कल्पना दिली व पाहणी करण्यासाठी विनंती केली, व संपूर्ण माढा तालुका दौरा चालू केला टेंभुर्णीतील मयत कुंटुंबाच्या वारसास चार लाख रूपये सोमवारी रोख स्वरुपात मिळणार आहेत तर इतर अतिवृष्टीत नुकसान झालेल्या कुंटुंबास अतितातडीने पाच हजार रूपये सोमवारी रोख स्वरुपात मिळणार आहेत.
त्यात टेंभुर्णी मध्ये यावेळी अतिवृष्टीची पाहणी करताना मा.खा.रणजितसिंह निबांळकर म्हणाले सर्वाच्या नुकसानीचे पंचनामे करा एकही पिडीत लाभापासून वंचित राहु नये अशा प्रशासनाला सुचना देण्यात आल्या. यावेळी भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे,भाजपचे माढा तालुका युवक नेते जयसिंग आप्पा ढवळे-पाटील,नागेश काका बोबडे,साई उद्योग समुहाचे भाऊसाहेब महाडिक देशमुख ,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, सतिश नेवसे,मा.सरपंच परमेश्वर खरात, टेंभुर्णी शहर चे भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष गिरीशकुमार ताबे, हरीभाऊ सटाले,विकास धोञे,शेखर जाधव,बापू वाघे.कैलास सातपुते, नानासाहेब देशमुख,सुदर्शन पाटील टेंभुर्णी यशपाल लोंढे,अमर कांबळे, अमरजी शेंडे. इतर टेंभुर्णीतील सर्व ग्रामस्थ तसेच तहसील दार,प्रांताधिकारी,ग्रामसेवक,तलाठी,पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे इ.उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील