माढा, सोलापूर २३ डिसेंबर २०२३ : सोलापूरच्या माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार सापटणे (टें) तलावात पाणी सोडुन तलाव भरून घेण्यात आला. येथील ग्रामस्थांनी उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष रावसाहेब मोरे व सिना-माढा चे अधिकारी आलाट साहेब, टेंभुर्णी शाखाचे अधिकारी लोंढे साहेब यांच्या कडे सतत पाठपुरावा करून भाजपा चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शामराव ढवळे पाटील आणि सापटणेचे युवा नेते विक्की ढवळे पाटील यांनी, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शिफारशीनुसार सापटणे तलाव भरून घेतला. ऐन उन्हाळ्यात सापटणेकरांना शेती आणि पिण्यासाठी पाणी मिळणार आहे, यामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
उजणी धरणात केवळ १८ % पाणी साठा असून अशा परिस्थितीत सापटणे तलाव दुष्काळ परिस्थितीमध्ये सुद्धा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार भरून मिळाला, त्याबद्दल सापटने वेणेगाव तांबवे गावातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल उजनी धरण पाणी व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व टेंभुर्णी कार्यालयाचे अधिकारी आल्हाट साहेब यांचा शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा भाजप मोर्चा उपाध्यक्ष जयसिंगाप्पा ढवळे पाटील, शिवसेना उबाठा तालुका सरचिटणीस सोमनाथ ढवळे, मोरे साहेब, सापटने ग्रामपंचायत सदस्य आबा मालक, पै.सोमनाथ ढवळे पाटील, तानाजी बापू कोरडे, वेणेगावचे प्रमुख किरण कदम, उपसरपंच सागर भैया शिंदे तसेच सापटणे गावचे नेते मोहन काका ढवळे तसेच दादा गायकवाड, हिरालाल घोडके आणि सापटणे पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील