खासदार सुप्रिया सुळे यांनी पॅरा-मोटरिंग करत सुमारे ८०० फूट उंचीवरून जेजुरी गडाच्या दर्शनाचा घेतला आनंद

जेजुरी, पुणे २४ नोव्हेंबर २०२३ : खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी येथे पॅरा-मोटरिंग करत सुमारे ८०० फूट उंचीवरून जेजुरी गडाच्या दर्शनाचा आनंद घेतला. मान्यता प्राप्त असलेल्या फ्लाईंग रायनो पॅरा-मोटरिंग सेंटर येथे साहसी खेळाचा एक वेगळा अनुभव सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी घेतला. जयाद्रीच्या डोंगरदऱ्या तसेच जेजुरी गडाचे विहंगम दृश्य या पॅरा-मोटरिंग ने बघायला मिळाल्याने प्रचंड आनंद झाला, असे यावेळी सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या. या प्रसंगी एअर फोर्सचे रिटायर्ड अधिकारी रामचंद्र काकडे आणि पेरा मोटरिंग क्लबचे संचालक कर्नल प्रशांत काकडे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्तिथ होते.

बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जेजुरीत पॅरा मोटरिंग सफरीचा आनंद घेताना जयाद्री पर्वत रांगातील खंडोबा मंदिर, कडेपठार मंदिर, ऐतिहासिक पेशवे काळातला होळकर तलाव पाहिला. खासदार सुळे या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांशी असलेल्या संवाद कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी महाविद्यालयाच्या जवळच असणाऱ्या कडेपठार रस्त्यावरील फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग अॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरला त्यांनी भेट दिली. सेवानिवृत्त पायलट रामचंद्र काकडे यांनी जेजुरी तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटकांसाठी पॅरामोटरिंग सेंटर उभारले आहे. जेजुरीच्या डोंगर परिसरातील सफर झाल्यावर खासदार सुळेंनी केंद्राचे संचालक काकडे यांचे कौतुक केले. खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना पॅरा-मोटरिंग सफरीतून खूप आनंद मिळेल असे त्या म्हणाल्या. जेजुरी येथे खंडोबा दर्शना बरोबरच पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अनेक जण या पॅरामोटरिंग सफरीचा आनंद घेत आहेत.

हे पॅरा-मोटर स्पेन वरून आणण्यात आली आहे. याला जगात प्रसिद्ध असलेल्या रोटॅक्स कंपनीचे इंजिन बसवण्यात आले आहे हे अत्यंत सुरक्षित असून विमान चालवण्याचे काम सेवानिवृत्त पायलट चंद्रकांत महाडिक करत आहेत. कडेपठारच्या डोंगर रस्त्यावरील एका मैदानात पॅरामोटरिंग सेंटर पाच महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले असून हे सेंटर उभारण्यासाठी केंद्र शासनाचे संरक्षण खाते, राज्य शासनाचे महाराष्ट्र टुरिझम यांची परवानगी घेण्यात आली आहे. वातावरणातील अनुकूलता बघूनच पर्यटकांना रायडिंग साठी नेण्यात येते. पॅरा-मोटरमध्ये पायलट व एक प्रवासी एकावेळी बसू शकतो.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजयकुमार हरीश्चंद्रे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा