पदमदुर्ग किल्ल्यावर तातडीने जेट्टी उभारण्याचे खासदार तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांचे आदेश

रायगड २१ जानेवारी २०२४ : रायगडचे खासदार सुनील तटकरे व अलिबाग मुरुड विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड पर्यटन महोत्सवात काही दिवसांपूर्वी पदमदुर्ग किल्ल्याचि दुरुस्ती करण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत पदमदुर्ग किल्ल्याला भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली व उपस्थित अधिकारी वर्गाला पदमदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना सहज उतरता यावे यासाठी तातडीने जेट्टीची उभारणी करण्याचे आदेश दिले आहेत.

किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नसून अधिकारी वर्गाने तातडीने प्रस्ताव तयार करून संबंधित खात्याकडे पाठवा त्याचा आम्ही स्वतः पाठपुरावा करून निधी व कामाची मान्यता आणून देवू असे प्रतिपादन खासदार तटकरे यांनी केले आहे. पदमदुर्ग किल्ल्याला प्रथमच खासदार सुनील तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांनी भेट देऊन एक नवा इतिहास रचला आहे. या आगोदर असणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री यांनी कधीही या किल्ल्याला भेट दिली नव्हती किंवा या किल्ल्या विषयी कोणतीही आस्था दाखवली नव्हती. असा टोला महेंद्र दळवी यांनी अनंत गीते यांना लगावला आहे.

परंतु या भेटीने पुरातत्व अधिकारी व मेरीटाईम बोर्ड अधिकारी यांच्या समवेत किल्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून भविष्यात पर्यटनाचा मार्ग मोकळा होणार हे मात्र निश्चित झाले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई विभागाचे पुरातत्व खात्याचे अधीक्षक शुभम मुजुमदार, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे उप अभियंता दीपक.वाय.पवार व मुरुड पुरातत्व खात्याचे प्रमुख बजरंग एलीकर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : गणेश म्हाप्रळकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा