खासदार तुमाने यांनी अजित पवार यांचे आव्हान स्वीकारावे

5

नागपूर, ७ जून २०२३: रामटेकचे शिंदे गटांचे खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. आता त्यांनी अजित पवार यांचे आव्हान स्वीकारावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विदर्भातील अकोल्यापासून सुरू झालेले दंगलीचे लोठ आता थेट कोल्हापूरपर्यत पोहोचले आहे.

यावेळी देशमुख म्हणाले की, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. निवडणुकीपूर्वी दंगली घडवून आणायच्या, लोकांच्या भावना भडकवायच्या आणि त्यांचा फायदा घ्यायचा, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. आता सावध राहून जनतेने असे प्रयत्न हाणून पाडावे. सत्ताधाऱ्यांच्या या डावाला बळी पडू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

पक्षात कुठलेही मतभेद नाहीत. नियुक्त्यांवरुन वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. चर्चेतून तोडगा काढता येईल, असे अनिल देशमुख म्हणाले. राज्यांचे वनमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सभ्य, सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते असल्याने शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत एकेरी उल्लेख करणे त्यांना शोभले नाही, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा