राज्यभरात आज एमपीएससीची पूर्व परिक्षा; पाचशे एक पदांसाठी होणार आज परीक्षा

मुंबई ,२१ ऑगस्ट २०२२: स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विधार्थी ग्रामीण भागातून शहरात येतात. व सर्वात जास्त प्रमाणात पुण्यात स्पर्धा परीक्षा देण्याऱ्या विधार्थी अधिक आहेत. तब्बल एक वर्षानंतर ही परीक्षा होत आसून जवळपास ५०१ पदांसाठी राज्यसेवेची ही पूर्व परीक्षा होत आहे.

आज दोन टप्प्यात ही परीक्षा होणार असून पहिला पेपर १० ते १२ तर दुसरा पेपर ३ ते ५ या वेळेत पार पडणार आहेत. या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पद भरतीच्या संख्येत वाढ केली आहे.

एमपीएससीच्या या वर्षीच्या परीक्षेत ३४० पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे‌. एमपीएससी कडून ११ मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात १६१ पदांचा समावेश होता.

मात्र शासनाकडून अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा २०२२ च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनदांचे वातावरण आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा