अभ्यास करत असताना एमपीएससच्या विद्यार्थिनीचा ह्रदयविकाराने मृत्यू…

पुणे, ३० सप्टेंबर २०२२ :पुण्यातील वडगाव शेरी येथील एका स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या तरुणीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी अचानक मृत्यूची नोंद केली आहे.

पूजा वसंत राठोड, वय वर्ष पंचवीस, असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पूजा ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील कोंडीतांडा या गावात रहात होती. ती पुण्यातील एका कंपनीत नोकरी करुन, स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती. ती आपल्या बहीणीसोबत वडगाव शेरी मध्ये राहत होती.

पूजा नेहमीप्रमाणे अभ्यासिकेत अभ्यास करीत बसली होती. अचानक तिला ह्रदयविकाराचा झटका आल्याने ती जागेवरच कोसळली. या नंतर काही विद्यार्थ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतू रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.

पूजाला ह्रदयविकाराचा झटका आल्याची घटना अभ्यासिकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पूजावर तिच्या मूळगावी म्हणजे कोंडीताडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सांगितले आहे. मात्र यावरुन आता तरुणाईनेदेखील आपल्या शरीराची काळजी घेण्याची गरज असल्याचं दिसून येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा