पुण्यात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले

13

पुणे, २ सप्टेंबर २०२३ : पुण्यातून लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. महावितरण कार्यालयाच्या बाणेर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याला सरकारी वीज कंत्राटदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून रवींद्र नानासाहेब कानडे (३७) असे लाच घेणाऱ्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर येथील महावितरणच्या उपकेंद्रावर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

एका कंत्राटदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. वास्तविक तक्रारदार हे सरकारी वीज कंत्राटदार आहेत. त्यांना R.M.C. प्लांटला वीजपुरवठा करण्यासाठी कंत्राट देण्यात आल होत. शासकीय योजनेच्या नियमा नुसार हे काम पूर्ण झाले. हे काम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यासाठी, उपकेंद्र बाणेर कार्यालयाचे सहायक अभियंता रवींद्र कानडे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने ही बाब उघड केली.

२८, २९ आणि ३१ ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने पॅनेलसमोर पडताळणी केली असता, तक्रारदाराने २०,००० रुपयांची लाच मागितली. याअंतर्गत शुक्रवारी उपकेंद्र बाणेर कार्यालय परिसरात पथकाने सापळा रचला. रवींद्र कानडे याला तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शीतल जानेवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड