महावितरणचा ढिसाळपणा बेतला जीवावर, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

मंचर, पुणे ९ सप्टेंबर २०२३ : साकोरे येथून दुचाकीवरून मंचर येथे जात असताना, साकोरे वडगाव रस्त्यावरील बंधाऱ्याजवळ महावितरणचा सिमेंटचा खांब अंगावर पडून, विशाल संतोष ढगे वय २२ या तरुणाचा मृत्यू झालाय. दुचाकीवरमागे बसलेला अजित साहेबराव मोंढवे हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. महावितरणचा हा खांब कुठलाही आधार न देता उभा केला होता.

रात्री झालेल्या पावसामुळे खांबाच्या खालील भागातील मातीचा भराव वाहून गेल्याने हा खांब अंगावर पडल्याचे ढगे यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान राजेंद्र हिले, विलास साबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयत विशालच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात विशालच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा