‘द व्हॅक्सिन वॉर’चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज, भारतातील पहिला बायो- सायन्स चित्रपट

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ : बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर, आज ९ सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात आले असून यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट या महिन्याच्या २८ तारखेला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

या चित्रपटाची कथा भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या COVAXIN बनवण्याच्या प्रवासाभोवती फिरताना दिसणार आहे. कोविड-१९ च्या काळात या महामारीचा सामना करण्यासाठी, देशातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी घेतलेली मेहनतही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‘द व्हॅक्सिन वॉर’ची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. ज्याचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून पल्लवी जोशी यांनी निर्मिती केली आहे. ज्यामध्ये पल्लवी जोशी, अनुपम खेर, नाना पाटेकर, रायमा सेन, सप्तमी गौडा आणि मोहन कपूर देखील दिसत आहेत. हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर ‘फुक्रे ३’ सोबत ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची टक्कर होणार आहे कारण त्याच दिवशी ‘फुक्रे ३’ चित्रपटगृहातही दाखल होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा