इंदापूर, दि. २९ जून २०२०: निमगाव केतकी ( ता. इंदापूर )येथील मुबारक पापाभाई मुलाणी ( वय ७१ ) यांचे आज रविवार दिनांक २८ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अकलूज ( जि. सोलापूर ) येथे खाजगी रुग्णालयात गेले पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान त्यांचे आज सकाळी ११ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली( विवाहित ) सुना नातवंडे असा परिवार आहे. झी २४ तास आणि दैनिक पुढारीचे इंदापूर तालुका प्रतिनिधी जावेद मुलाणी यांचे ते वडील होत.
निमगाव केतकी येथे शोकाकुल वातावरणात त्यांचेवर दफन करण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते संस्था आजीव सभासद होते. त्यांनी ४६ वर्षे नाईक पदावर नोकरी केली. त्यांचा मुस्लिम समाजासह इतर क्षेत्रात मोलाचा सहभाग होता.
ते आब्बा म्हणून सर्वदूर परिचित होते. त्यांचे निधनाने निमगाव केतकी परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, राजवर्धन पाटील, देवराज जाधव, नानासाहेब शेंडे यांनी मुलाणी परिवाराचे सांतवन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे