मुकेश अंबानी जगातील टाॅप १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर….

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२०: भारतातील सर्वात श्रीमंत आसलेले प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांना एक झटका बसला आहे. ते जगातील टाॅप १० या श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. गेल्यावेळी जाहीर झालेल्या यादीत देखील त्यांची घसरण झाली होती आणि ते १० व्या क्रमांकावर होते. मात्र, आता ते या यादीतूनच बाहेर गेले आहे.

ब्लुमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनं जगातील टाॅप १० श्रीमंताची यादी जाहीर केली आहे आणि त्यांच्या नुसार अंबानी ७२.२ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ११ व्या स्थानावर गेले आहेत. तर ॲमेझाॅनचे जेफ बोजोस १८३ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

ब्लुमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार ॲमेझाॅनचे जेफ बोजोस १८३ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर बिल गेट्स १२८ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ॲलेन मस्क हे १२१ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर, बर्नाल्ड अर्नाल्ट १०५ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह ४ थ्या क्रमांकावर, मार्क झुकरबर्ग १०२ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह जगात ५ व्या क्रमांकावर, वाॅरेन बफे ८५.९ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह ६ व्या क्रमांकावर, लॅरी पेज ८१.६ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह ७ व्या क्रमांकावर, सग्री ब्रिन ७९ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह जगात ८ व्या क्रमांकावर, स्टीव्ह बाल्मर ७६.२ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह जगात ९ व्या स्थानी आहेत तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या क्रमांकावर फ्रँक्वाइज बेट्टेकोर्ट मेयर्स ७३.७ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीसह आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा