मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी, वॉरने बफेंना टाकलं मागे

नवी दिल्ली, ११ जुलै २०२० : श्रीमंतांच्या यादीत जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी बनले आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत मध्ये ते सातव्या क्रमांकावर पोहचले आहेत. मुकेश अंबानी ह्यांनी ह्या यादीतील बर्कशायर हाथवेचे प्रमुख वॉरेन बफेट, गूगलचे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन याना मागे टाकले आहे.

फोर्ब्स यांनी जगातील सर्वाधिक श्रीमंत १० व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीत आशिया खंडातून फक्त मुकेश अंबानी यांना स्थान मिळाले आहे. त्यांना या यादीत सातव्या क्रमांकावरचे स्थान मिळाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ७० अरब डॉलर झाली.

मागील २० दिवसांमध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत जवळपास ५.४ अरब डॉलर एवढी वाढ झाली. संपत्ती वाढीनंतरच ते श्रीमंतांच्या यादीत सातव्या क्रमांकवर पोहचले आहेत. काही दिवसांपूर्वीच २० जून रोजी आलेल्या फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानींचा क्रमांक ९ होता. फोर्ब्सची यादी संबंधित उद्योगपतीच्या व्यवसायातील शेअरच्या किमतीवरुन बनवली जाते.

फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जेफ बेजोस याचं नाव आहे. जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती १८८.२ अरब डॉलर आहे. दुसरीकडे बिल गेट्स ११०.७० अरब डॉलरच्या संपत्तीसह दूसऱ्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड ऑर्नोल्ट फॅमिली १०८.८ अरब डॉलर संपत्तीसह यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्क जुकरबर्ग ९० अरब डॉलरसह यादीत चौथ्या स्थानी आहे. स्टीव बॉल्मर ७४.५ अरब डॉलरसह पाचव्या आणि लॅरी एलिसन ७३.४ अरब डॉलर संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

मुकेश अंबानी ७०.१० अरब डॉलर संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत जागतिक स्तरावर ७ व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर वॉरेन बफे, लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा