मुकेश अंबानींचा मोठा निर्णय, करणार हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार

नवी दिल्ली, 12 जून 2022: रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे अनेक दिवसांपासून ब्रिटनमध्ये मोठी डील करण्याचा प्रयत्न करत होते. आता ते या डीलच्या जवळ आले आहेत, जो रिलायन्सचा परदेशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असेल.

देण्यात आली होती बूट्स या औषध कंपनीला ही ऑफर

रिलायन्स इंडस्ट्रीज बर्याच काळापासून वॉलग्रीन्सचा ड्रग रिटेलर ब्रँड बूट खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. आता ब्लूमबर्गने अहवाल दिलाय की रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बायआउट फर्म अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट इंक. यासाठी बंधनकारक ऑफर सादर केली आहे. आता हा करार पूर्ण झाला तर रिलायन्सचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा परदेशी करार असेल. बूट ही जगातील सर्वात मोठ्या औषध विक्रेत्या कंपन्यांपैकी एक आहे.

बातमीनुसार, रिलायन्सने कंपनी विकत घेण्यासाठी 5 बिलियन पौंड म्हणजेच सुमारे 48,123 कोटी रुपयांची ऑफर दिलीय. हा करार रिलायन्ससाठी इतका सोपा नव्हता.

ब्रिटीश-गुजराती Issa Brosने रस्ता अडवला होता

मुकेश अंबानी हे मूळचे गुजरातचे आहेत. या कराराचा त्यांचा मार्गही इसा ब्रदर्स या ब्रिटिश-गुजराती ब्रदर्सनेनी रोखला होता. खरं तर, बूटसाठी बोली लावण्याच्या पहिल्या फेरीत, इस्सा ब्रदर्सने सर्वात मोठी बोली सादर केली होती. भारतातील भरुचचे राहणारे मोहसीन इसा आणि झुबेर इसा यांनी त्यांच्या युरो गॅरेज कंपनीमार्फत या करारासाठी बोली लावली होती. ही युरोपमधील सर्वात मोठ्या पेट्रोल पंप कंपन्यांपैकी एक आहे. यासोबतच या बंधूंकडं ब्रिटिश सुपरमार्केट चेन कंपनी Asda आणि रेस्टॉरंट चेन कंपनी Leon देखील आहे.

दोन्ही भावांनी टीडीआर कॅपिटलसोबत मिळून या अधिग्रहणासाठी बोली लावली होती, पण आता त्यांनी आपली नावं मागं घेतली आहेत. कारण त्यांना वॉलग्रीन्सचे मूल्यांकन जास्त वाटत होते. दरम्यान, ब्रिटनमध्ये कर्ज महाग झाले आहे, त्यामुळं त्यांना या डीलसाठी कर्ज उभारणं कठीण होणार आहे.

आता फक्त रिलायन्सच दावेदार आहे
यापूर्वी वॉलग्रीन्सने बूट विक्रीसाठी 7 अब्ज पौंड, सुमारे 67,372 कोटी रुपयांचे मूल्यांकन केलं होतं. आता इसा ब्रदर्सचे नाव मागे घेतल्याने समोर फक्त रिलायन्स आणि अपोलोचे कंसोर्टियम उरले आहे. यूकेमध्ये बूट्सची 2,200 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. कंपनीकडं No.7 ब्युटी सारखा खाजगी लेबल ब्रँड देखील आहे. त्याच वेळी, कंपनीचा युरोपमधील इतर देशांमध्ये मोठा व्यवसाय आहे.

बूट हा रिलायन्सचा परदेशातील पहिला करार नाही. या वर्षी मार्चमध्ये, कंपनीने, तिच्या उपकंपनी रिलायन्स न्यू एनर्जीद्वारे, यूएस-आधारित लिथियम वर्क्स सुमारे $60 दशलक्षमध्ये विकत घेतले होते. ही कंपनी लिथियम बॅटरी तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. याआधी रिलायन्सने UK ची 262 वर्षे जुनी खेळणी कंपनी Hamleys देखील विकत घेतली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा