मुख्यमंत्री काढणार राज्याची आर्थिक श्वेतपत्रिका

मुंबई : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेत असल्याचे बघायला मिळत आहे. राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
विधिमंडळातील पत्रकार कक्षातील अनौपचारिक गप्पांदरम्यान छगन भुजबळ यांनी हि माहिती दिली.
यावेळी भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे. ही एक प्रकारची आर्थिक श्वेतपत्रिका असेल. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यातील विविध विकासकामे व प्रकल्प यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यांची सद्य परिस्थिती व पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी यांची माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे.
जेणेकरून विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवता येईल. यामध्ये बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात येईल. मात्र, केवळ आकसापोटी कोणताही प्रकल्प रद्द करणार नाही. सुरुवातीला कामे मार्गी लावण्यासाठी शपथविधी झालेल्या सात मंत्र्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाईल. तर अंतिम खातेवाटपाचा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे व भुजबळ यांनी दिलेल्या सदरील माहितीमुळे सर्वच क्षेत्रांच्या आशा पल्लवित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा