मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुणे कोर्टाकडून समन्स

पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या “दैनिक सामना” या वृत्त पत्रातून भारताचा उल्लेख हिंदुस्थान असा करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे कोर्टाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आले आहेत. या दोघांविरोधात पुणे कोर्टाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.

याबाबत एक वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून भारताचा उल्लेख वारंवार ‘हिंदुस्थान’ असा केला जातो आहे याला पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. पाटील यांनी या प्रकरणी पुणे न्यायालयात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली.

पुणे न्यायालयाने सोमवारी ही याचिका दाखल करुन घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांना समन्स बजावलं.
या दोघांनाही ११ फेब्रुवारीला पुणे न्यायलायात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हेमंत पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी ही याचिका दाखल केली होती.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. ‘सामना’ हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. मात्र एकाच वेळी दोन पदांवर राहू शकत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चं संपादकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आधी कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत ‘सामना’चे संपादक असतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा