मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता?

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडुन गेल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या २४ जानेवारीला निवडणुक होत आहे. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.रिक्त झालेल्या एका या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे परळी मतदार संघातुन विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या २४ जानेवारीला मतदान होणार आहे.
या रिक्त झालेल्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवारी हे महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना सहा महिन्यात कोणत्याही एका सभागृहात निवडुन येणे आवश्यक असल्याने ते ही पोटनिवडणुक लढवतील अशी चर्चा आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२२ पर्यंत होती. विधानसभेतील पक्षिय बलाबल पाहता महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार सहज विजय प्राप्त करू शकतो.

केंद्रीय निवडणुक आयोगाने आज केलेल्या घोषणेनुसार या पोटनिवडणुकीची अधिसूचना येत्या ७ जानेवारीला जारी करण्यात येणार आहे. १४ जानेवारी हि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून,१५ जानेवारीला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल.तर १७ जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.एका पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास २४ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा