मुख्यमंत्र्यांच्या शहरात पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्याची वेळ

42

नागपूर ; नागपूर पोलिसांना आपल्याच कर्मचाऱ्यांना अटक करण्याची वेळ आली आहे. ड्रग तस्करांकडून घेतलेली लाच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस चौकीमध्ये लपवून ठेवली होती. पोलीस कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी ही लाच जप्त केली व आपल्या एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांना अटक केली. संबंधित गुन्हेगारांनी लाच दिल्यानंतर आपला माल त्यांना मागितला परंतु त्यांनी तो देण्यास नकार दिला. आणि पैसे देऊनही ड्रग्स परत न दिल्याने गुन्हेगारांनीच एका वरिष्ठ अधिकाऱ्याला निनावी फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. आणि हा सर्व प्रकार समोर आला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा