गोल पोस्ट राजकारण मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहा यांची भेट

मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहा यांची भेट

नवी दिल्ली : राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेवरून जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियरी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमवेत सरकार बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

यासर्व घडामोडीत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय घडले याची माहिती अद्यापही समोर आली नसल्याची माहिती मिळते आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version