मुळ्याच्या पानांची भाजी आणि मुळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही या हिवाळ्यात मुळा औषध म्हणून तरी नक्की खायला हवा. मुळ्यापासून कोशिंबीर, भाजी, पराठे, पुऱ्या असे पदार्थ घरात तयार केले जातात. काहीवेळा कच्चा मुळा खाणंही अधिक फायदेशीर असतं. मुळ्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस आणि लोह असतं. त्यामुळे तुम्हाला डायबेटीस, रक्त कमी असेल, अॅनिमिया यांसारख्या अनेक आजारांवर फायदेशीर आहे.
१) हाडांना मजबूती देणारा मुळा:
मुळा दात आणि हाडांना मजबूती देतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी मुळ्याचं सेवन केल्यानं फायदा होतो.
२) कावीळ आजार बरा होण्यासाठी लाभदायक:
कावीळ असलेल्या रुग्णांना मुळा हे औषध म्हणून मोठं वरदान आहे. मुळ्यामुळे शुद्ध होतं आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो. मुळाच नाही तर त्याच्या पानांची भाजी करून खाल्ल्यास कावीळ बरी होण्यास मदत होते.
३) मुत्रायश आणि ब्लडप्रेशरच्या आजारावर रामबाण उपाय:
ब्लडप्रेशरचा त्रास असणऱ्यांनी कच्चा मुळा आपल्या आहारात नियमित सेवन केल्यानं हा त्रास नियंत्रणात राहिल. मुळव्याधीचा त्रास, मुत्राशयाचे विकार असणाऱ्यांनी कच्च्या मुळ्याचं उपाशिपोटी सेवन केल्यानं त्रास दूर होण्यास मदत होते.
४) भूक वाढण्यासाठी मदत:
बऱ्याचवेळा भूक न लागण्याचे प्रकार घडतात. पोटात जंत झाले असेल तरीही भूक मंदावण्याच्या समस्या उद्भवतात. ही समस्या वयस्कर नागरिकांना आणि लहान मुलांमध्ये जास्त आढळून येते अशावेळी त्यांना कच्चा मुळा, मुळ्याचे वेगवेगळे पदार्थ खायला द्यावेत. त्यामुळे भूक वाढण्यास मदत होते. मुळा खाल्ल्यानं रक्ताभिसरण सुरळीत होते. डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही मुळा उपयुक्त आहे. लोकांची पचनक्रिया व्यवस्थित नाही आणि पोट साफ होत नसेल, तर त्यांनी कच्चा मुळा खावा.
५) किडनीचं स्वास्थ सुधारण्यासाठी मदत:
शरीरातील बॅक्टेरिया मारण्याचं काम मुळा करतं. त्यासोबतच रक्ताभिसरण नीट व्हाव यासाठी कार्य करतं. मुळ्याचं नियमित सेवन केल्यानं किडनीच्या विकारांपासून तुम्ही दूर राहू शकता. मुळ्याला नॅचरल क्लीनझरही म्हटलं जातं. मुळा खाल्ल्यानं शरीरातील नको असलेला कार्बनडाय ऑक्साईड आणि बॅक्टेरिया शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. त्यातील फायबर आतड्यांना मजबूती देण्यास मदत करतं त्यामुळे आजारी असणाऱ्यांनी मुळा खाणं हा आजारावरील रामबाण उपायच मानलं जातं.
मुळ्यात अ जीवनसत्त्व, ब आणि क जीवनसत्त्वही पुरेशा प्रमाणात असतात. हिवाळ्यात मुळा सहज उपलब्ध होणारं असल्यानं त्याचं सेवन आवश्यक करावं.