नदीकाठच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी; मुळा मुठा आणि भीमा नद्या होणार स्वच्छ

20
Mula Mutha River Clean PCMC PMC
नदीकाठच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी; मुळा, मुठा आणि भीमा नद्या होणार स्वच्छ

Mula Mutha and Bhima rivers will be cleaned: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रदूषणामुळे दूषित झालेल्या मुळा, मुठा व भीमा नदी पात्रातील जलपर्णीची समस्या निवारण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जाणार असल्याचे आश्वासन नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आमदार राहुल कुल यांनी पावसाळी अधिवेशनात पुणे महानगरपालिकेद्वारे केला जाणारा अतिरिक्त पाणी वापर याबाबत कार्यवाहीची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, आता लवकरच या नद्यांमधील प्रदूषण कमी होणार आहे.

दूषित पाण्यामुळे दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यांतील ग्रामीण भागातील नदीकाठचे नागरिक त्रस्त आहेत. जलप्रदूषणामुळे त्यांना विविध आजारांना, समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये मोठी नाराजी होती. मात्र, आता प्रशासनाने सकारात्मक पावले उचलल्यामुळे त्यांची चिंता दूर झाली आहे.

जलपर्णीला आळा घालण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांडपाण्यावर उपाय योजना करण्यात येणार आहे. त्यामुळे नद्यांमधील प्रदूषण कमी होणार आहे.

या निर्णयामुळे नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता त्यांना स्वच्छ पाण्यात पोहता येणार आहे, तसेच शेतीसाठीही स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा