गोल पोस्ट महाराष्ट्र मुलाने केला आईचा खून

मुलाने केला आईचा खून

वाघोली : मुलाने जेवण उशिरा का बनविले या कारणावरून आई आणि मुलांमध्ये भांडण झाले. या भांडणात मुलाने आईचा चाकु भोसकून खून केल्याची घटना वाघोली येथील गणेशनगर परिसरातील तारांगण सोसायटीमध्ये शुक्रवारी(दि.२२) रोजी संध्याकाळी साडे आठच्या सुमारास घडली.
मुलाने केलेल्या हल्ल्यात आईला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या बहिणीवर देखील चाकूने हल्ला केला आहे.
लिलाबाई शामराव चव्हाण असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी खुनी मुलगा गणेश शामराव चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रिया रविंद भोसले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
आरोपीला लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले . पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version