गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा प्रसिद्ध अभिनेत्री शौकत आझमी यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्री शौकत आझमी यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री शौकत आझमी (वय ९३) यांचे शुक्रवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. अभिनेत्री शबाना आझमी यांच्या त्या आई होत. शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तर यांनी शौकत आझमी यांच्या निधनाची माहिती दिली.
शौकत यांना काही दिवस कोकिळाबेन धिरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यानंतर त्या घरीच होत्या. त्यांच्या पार्थिवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे जावेद अख्तर यांनी सांगितले.
शौकत आझमी आणि त्यांचे पती प्रख्यात कवी कैफी आझमी यांच्याच पुढाकाराने भारतीय कम्युनिस्ट पक्षप्रणित ‘इप्टा’ ही प्रायोगिक नाटय़संस्था आणि पुरोगामी लेखक संघटना स्थापन झाली होती.

error: Content is protected !!
Exit mobile version