मुंबई : एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने कोणताही अन्याय केलेला नाही. त्यांना पक्षाने वेळोवेळी अनेक संधी दिली. त्यांच्या मुलीचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे ते भाजपवर टीका करत आहेत, असे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्याने भाजपच्या कामगिरीवर आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. जे यशाचे श्रेय घेतात. त्यांनी पराभवाचे पण घ्यावं, ज्यांनी नेतृत्व केले, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी, असे खडसे म्हणाले होते.
पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव झाला नाही तर तो घडवून आणला गेला. ओबीसी नेत्यांवर भाजपमध्ये अन्याय केला जातोय, असेही खडसे म्हणाले.
यानंतर संजय काकडेंनी आपले मत व्यक्त केले आहे.
मी भाजपचा खासदार नाही, भाजपचा सहयोगी खासदार आहे. त्यामुळे भाजपला सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही संजय काकडेंनी यावेळी स्पष्ट केले.