गोल पोस्ट राजकारण मुंबई आणि नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा भाजपला धक्का

मुंबई आणि नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा भाजपला धक्का

मुंबई : महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीमुळे पुन्हा एकदा भाजपला धक्का बसला आहे. मुंबई आणि नाशिकमध्ये रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक १४१ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने जागा राखली आहे. या प्रभागातून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत. लोकरे यांना ४४२७ मते तर भाजपचे दिनेश पांचाळ यांना ३०३२ मते मिळाली.
नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून मनसेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.
मनसेचे उमेदवार दिलीप दातीर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर या प्रभागात भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

error: Content is protected !!
Exit mobile version