मुंबई इंडियन्सने ‘आयपीएल’ २०२३ साठी दिग्गज ‘मार्क बाऊचर’ यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.

18

पुणे ,१७ सप्टेंबर २०२२ : इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सर्वात यशस्वी फ्रेंचाय झी मुंबई इंडियन्स या संघातून मोठी बातमी पुढे येत आहे. ‘मुंबई’ संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महेला ने २०१७ साली मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रशिक्षक पद स्वीकारले होते. महेला यांनी प्रशिक्षक पदावर स्वीकारल्यावर मुंबई इंडियन्स तीन वेळा जेतेपद पटकावले पण गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियनस ची कामगिरी सर्वात वाईट झाली होती. आयपीएलमधून मुंबई इंडियन्स गेल्यावर्षी सर्वात पहिल्यांदा बाहेर पडली होती .

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी मागील हंगाम खूपच वाईट ठरला यामुळेच आता मुंबई इंडियन्स हा संघ आगामी हंगामात नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.

मुंबई इंडियन्सने महेला जयवर्धने यांच्या जागी आयपीएल २०२३ साठी मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू मार्क बाउचर यांची नियुक्ती केली आहे .मुंबई इंडियन्सने ‘शुक्रवारी’ (१६ सप्टेंबर)’ याबद्दल सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आहे.

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाल्यानंतर ‘मार्क बाउचर’ म्हणाला की एमआयच्या मुख्य प्रशिक्षक पद नियुक्ती होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. फ्रॅंचायझी म्हणून त्यांचा इतिहास आणि कामगिरी त्यांना जगातील सर्वात यशस्वी स्पोर्ट्स फ्रॅंचायझीपैकी एक म्हणून स्पष्टपणे स्थापित केले आहे. म्हणूनच मी या नवीन आव्हान साठी तयार आहे.

प्रशिक्षक म्हणून बाऊचरची कामगिरी

‘ दक्षिण आफ्रिकेचे’ प्रशिक्षक असताना बाउचरचे आकडे उत्कृष्ट राहिले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी आपल्या देशाचे प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला ‘बाऊचर’ च्या कारकीर्दीत दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघाने दहा, टेस्ट मॅच मध्ये यश मिळवले तर बारा, वनडे आणि तेवीस,टी ट्वेंटी मध्ये विजय मिळवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा