New National Crush Vignesh Puthur: क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच काही चेहरे असे असतात, जे आपल्या खेळीने आणि आकर्षक अंदाजाने चाहत्यांना वेड लावतात. विराट कोहली, शुभमन गिल यांसारख्या क्रिकेटर्सनंतर आता एका नव्या चेहऱ्याने तरुणाईला अक्षरशः घायाळ केले आहे. तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा नवा स्टार, विघ्नेश पुतुर!
आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पदार्पण करताच, त्याने आपल्या दमदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण केवळ त्याच्या खेळानेच नाही, तर त्याच्या स्टायलिश लुक्सनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर त्याच्या रिल्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. चाहते त्याच्या प्रत्येक क्लिपला तुफान लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.
विघ्नेश पुतुर, एक नवा हार्टथ्रोब!
अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत क्रिकेट चाहत्यांसाठी विघ्नेश एक नवीन नाव होते. पण आता, तो लाखो तरुणींच्या क्रश लिस्टमध्ये सामील झाला आहे. त्याच्या गोलंदाजीप्रमाणेच त्याची पर्सनॅलिटीही लोकांना आकर्षित करत आहे. त्याचे लांबसडक केस, आत्मविश्वासपूर्ण हसरा चेहरा आणि फिटनेसने भारलेला लूक पाहून अनेक मुली त्याच्यासाठी वेड्या झाल्या आहेत.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल;
इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, सगळीकडे विघ्नेशचे फोटो आणि व्हिडिओ ट्रेंड होत आहेत. त्याच्या एका स्माईलवर हजारो कमेंट्स येत आहेत – “क्रश मटेरियल”, “नवीन विराट कोहली आलाय”, “माझ्या स्वप्नांचा राजकुमार” अशा कमेंट्स पाहूनच कळतंय की लोक त्याच्यावर किती फिदा झाले आहेत.
खरा टॅलेंट चमकलाय
फक्त लुक्सच नाही, तर त्याचा खेळही लोकांच्या मनावर राज्य करतोय. केरळच्या एका छोट्या गावातून आलेल्या या खेळाडूने मेहनतीने हे यश मिळवलं आहे. त्याने पहिल्याच सामन्यात 3 विकेट्स घेत आपल्या टॅलेंटची चुणूक दाखवली. आता चाहते म्हणतायत – “यावर्षी आयपीएलने खऱ्या टॅलेंटला न्याय दिला!”
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे