मुंबई- लखनऊमध्ये होणार लढत; मोठ्या खेळीची प्रतीक्षा आज संपणार का?

16
Rohit sharma Rishabh Pant
मोठ्या खेळीची प्रतीक्षा आज संपणार का?

Mumbai Indians vs Lucknow Super Giants IPL 2025:आज आयपीएलच्या हंगामात शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात सर्व चाहत्यांच्या नजरा मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि लखनऊ सुपर जायंटच्या रिषभ पंतकडे असणार आहेत.आयपीलच्या इतिहासात आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकवलेल्या मुंबईची सुरुवात यंदाच्या हंगामात चांगली राहिली नाही. त्यांना या हंगामातील तीन सामन्यात केवळ 2 गुण मिळवता आले असून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईसाठी चिंतेचा विषय राहिला आहे.

रोहितला यंदाच्या आयपीएलमधल्या पहिल्या तीन सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्याने अनुक्रमे 0,8 आणि 13 धावाच केल्या आहेत. अशीच स्थिती दुसरीकडे रिषभ पंतची असून त्याने तीन सामन्यात केवळ 17 धावा केल्या आहेत. दोन्ही भारतीय संघाचे अनुभवी खेळाडू असून सध्या चांगल्या लयीत नसल्याने याचा फटका त्यांच्या संघाला बसताना दिसत आहे.त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात रोहित आणि पंतचे प्रयत्न मोठी खेळी करण्याचे असेल.याशिवाय दोन्ही संघात 2 गुण मिळवण्यासाठी काटेकी टक्कर पहायला मिळणार आहे. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर आज खेळवण्यात येणाऱ्या सामन्याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा विचार करता सूर्यकुमार यादव आणि अश्विनी कुमार यांच्याकडे सुद्धा चाहत्यांच्या नजरा असणार आहे. कोलकता विरुद्धच्या सामन्यात अश्विनी कुमारने शानदार गोलंदाजी केली होती. त्यानं 4 विकेट्स घेत मुंबईचा विजयाचा मार्ग सुकर केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा