मुंबई इंडियन्सच्या महिला संघाने रचला इतिहास, जिंकलं पहिल्या महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद

मुंबई, २७ मार्च २०२३ : महिला प्रीमियर लीगला पहिला विजेता मिळालाय. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. मुंबईने हा सामना सात गडी राखून जिंकला. यासह हरमनप्रीत कौरने लॅनिंगविरुद्ध असं काम केलं जे तिला यापूर्वी कधीही करता आलं नव्हतं. डब्ल्यूपीएल विजेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने नऊ गडी गमावून १३१ धावा केल्या. मुंबईने हे लक्ष्य १९.३ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केलं आणि दिल्लीचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

नाणेफेकीच्या वेळी दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा बाजी मारताना दिसली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना बहुतांश सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात आली. अशा स्थितीत हा निर्णय योग्य वाटला. दुसऱ्या षटकात जेव्हा शेफाली वर्माने इझी वँगच्या पहिल्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारला तेव्हा ती एकदम परफेक्ट दिसत होती, पण त्यानंतर दिल्लीसाठी काहीही योग्य झालं नाही.

इथंच सामन्यात टर्निंग पॉइंट आला, ज्यामुळं दिल्लीला पुनरागमनाची संधी मिळाली. हरमनप्रीत कौर (३७) एक दमदार खेळी खेळत धाव चोरण्याच्या प्रयत्नात धावबाद झाली. मात्र, त्यानंतरही मुंबईने हार मानली नाही. सिव्हर-ब्रंटने क्रीजवर टिकून राहून अर्धशतक पूर्ण केलं. १९व्या षटकात अमेलिया कार (नाबाद १४) आणि सिव्हर-ब्रंट (नाबाद ६०, ५५ चेंडू) यांनी जेस जॉन्सनच्या षटकात ३ चौकारांसह १६ धावा काढून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. २०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सिव्हरने चौकार लगावत संघाला चॅम्पियन बनवलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा