मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी “या” तारखेला धावण्याची शक्यता…..

मुंबई, १६ डिसेंबर २०२०: सर्वसामान्य मुंबईकरांची राणी म्हणजे लोकल. मुंबईतील आनेक उपनगरांना सहज जोडणारी लोकल कोरोना मुळं थांबली आहे. आज जवळपास आठ महिने झाले असून मुंबईची राणी ही सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी लोकलच्या फेऱ्या चालू आहेत. मात्र, अश्यातच एक आनंदाची बातमी आली आहे.

लोकलबाबत सरकारतर्फे माहिती देण्यात आली. आता नव्या वर्षात एक जानेवारीपासून रेल्वे रुळावर आणू असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मधल्या काळात सणसुद सुरू झाले आणि कोरोनाचं सावट कमी जास्त होवू लागल्यानं सरकार देखील लोकल बाबत निर्णय घ्यायला विचार करत आहे.

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येतेय. दुसरी लाट येणार असं म्हटलं जात होतं पण तशी चिन्ह दिसत नाहीयत. त्यामुळं नव्या वर्षात लोकल सुरु व्हायला अडचण नसावी अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली. ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलनं प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिली होती.

काय म्हणाले होते आयुक्त

पुढील दोन आठवड्यावर ख्रिसमस व ३१ डिसेंबर यासारखे दोन महत्त्वाचे दिवस येत आहेत. या दरम्यान जर नागरिकांनी गर्दी केली नाही तर याबाबत निर्णय घेऊ असे आयुक्तांनी सांगितलं. विशेष म्हणजे या आधी देखील दिवाळी मध्ये मुंबईत संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली होती. मात्र, दिवाळीनंतरही मुंबईत कोरोनाची स्थिती सामान्यत राहिली. दिवाळीनंतर चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण घटले आहे. मे-जून महिन्यात कोरोनाबाधितांचं प्रमाण ३८ टक्के होतं. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हेच प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत घसरलं.

सध्या मुंबई ची लोकल ही महिलांसाठी धावत असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणजेच डाॅक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांच्या साठी लोकल आपलं कर्तव्य बजावत आहे. तर सर्वसामान्य जनता ही लोकलमधे प्रवास कधी करता येईल याची आतुरतेनौ वाट पाहत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा