मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार, पुढील ४८ तासांत मुसळधार

26

मुंबई २६ जून २०२३: मान्सून ने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. पुढील ४८ तासांत मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील ४८ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सोमवारी पहाटेपासून राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे, यामुळे अखेर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. विकेंडच्या दिवशी पाऊस झाल्याने मुंबईकरांनी पावसाचा मनसोक्त आनंदही घेतला. विविध जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाही सुखावला आहे.

बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीपर्यंत पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं, काही भागांतील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. कुलाबा वेधशाळेने रविवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासांत, ८६ मिमी पावसाची नोंद केली, तर उपनगरात सांताक्रूझ हवामान केंद्राने याच कालावधीत १७६.१ मिमी पावसाची नोंद केली, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा