मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे पाच वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे.
या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील व्यावसायिक धावपटूंसोबत हजारो हौशी धावपटू तसेच मुंबईकर अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. मॅरेथॉनच्या एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगणार आहे.
यंदा या स्पर्धेचं १७ वं वर्षं असून या प्रतिष्ठेच्या शर्यतीत ५५,३२२ धावपटूंनी सहभाग घेतला आहे.
मुख्य स्पर्धेतील विजेत्याला ४५ हजार, २५ हजार आणि १७ हजार डॉलरचे बक्षीस मिळेल तर अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे ५, ४ आणि ३ लाख रुपयाचं पारितोषिक मिळेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा