नूपूर शर्माला समन्स बजावण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक दिल्लीत दाखल

12

नवी दिल्ली, 17 जून 2022: पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना समन्स करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक दिल्लीत पोहोचलंय. नुपूर शर्माला बोलावण्यासाठी मुंबईचे पोलिस पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुपूर शर्माला यापूर्वी तिच्या ईमेलवर समन्स देण्यात आलं होतं. आता फिजिकल कॉपी देण्यासाठी पोलिसांचं एक पथक दिल्लीत आलं आहे.

नुपूर शर्माला पाठवलेल्या समन्समध्ये मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी तिला 25 जून रोजी सकाळी 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी हा एफआयआर नोंदवला आहे.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. वाद वाढल्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं. भारताशिवाय डझनभराहून अधिक इस्लामिक देशांनीही त्यांच्या विधानाला विरोध केला होता. तीच्यावर अनेक राज्यांत एफआयआर दाखल करण्यात आले होते.

मुंब्रा आणि ठाण्यातही नुपूरवर केस

नुपूर शर्माला मुंब्रा पोलिसांनी बोलावले होते. पोलिसांनी तिला 22 जून रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंब्रा येथील मोहम्मद गुफरान खान नावाच्या शिक्षकाने नुपूरविरोधात गुन्हा दाखल केला होता. याशिवाय ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोलकाता पोलिसांकडूनही समन्स प्राप्त

याशिवाय कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्माला समन्स बजावलं आहे. तिला 20 जून रोजी नरकेलडांगा पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस अबुल सोहेल यांनी कोंटाई पोलीस ठाण्यात तीच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा