मुंबई पोलिसांचं मोठं यश, सात कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह सात जणांना अटक

मुंबई, 27 जानेवारी 2022: बनावट नोटा छापून त्याचं वितरण करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांनी बुधवारी या टोळीतील सात जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून सुमारे 7 कोटी रुपयांच्या (7 कोटी) बनावट भारतीय नोटा जप्त केल्या. ते म्हणाले की, गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-11 ने मंगळवारी संध्याकाळी दहिसर चेकपोस्टवर एक कार अडवली. अटकेनंतर आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केलं असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, पोलिसांनी कारमध्ये बसलेल्या चार जणांना पकडलं आणि त्यांची चौकशी केली. कारच्या झडतीदरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सुमारे 5 कोटी रुपये किमतीच्या 250 बनावट नोटांच्या (2,000 रुपयांच्या) बंडल असलेली बॅग सापडली. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कारमधील चार जणांची चौकशी केली असता, पोलिसांना त्यांच्या आणखी तीन साथीदारांची माहिती मिळाली.

यानंतर पोलिसांनी अंधेरी (पश्चिम) येथील एका हॉटेलवर छापा टाकून तिघांनाही अटक केली. या अधिकाऱ्यानौ सांगितलं की, त्यांच्याकडून बनावट नोटांचे आणखी शंभर बंडल (दोन हजाराच्या) सापडले, ज्यांची किंमत दोन कोटी आहे. बनावट नोटांव्यतिरिक्त पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप, सात मोबाईल फोन, 28,170 रुपयांच्या खऱ्या नोटा आणि इतर अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत. डीसीपी संग्रामसिंह निशानदार (डिटेक्शन-1) यांनी सांगितलं की, तपासात एक आंतरराज्य टोळी बनावट नोटांची छपाई आणि वितरणात काम करत असल्याचं समोर आलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा