आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दोन तास बंद, दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत वाहतूक राहणार बंद

पुणे, २७ जुलै २०२३ : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी, २७ जुलै रोजी दुपारी दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माहितीनुसर मुंबईकडे जाणारा रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे या वेळेत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करावा लागणार आहे.

तीन दिवसांपूर्वी एक्स्प्रेस वेवर दरड आल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर दरड हटवण्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आता २७ जुलै रोजी मुंबई द्रुतगती मार्ग दुपारी १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. मात्र, एक्सप्रेस वेवर अजूनही काही ठिकाणी दगड अडकले आहेत. हे धोकादायक ठरू शकत असल्याने असे दगड काढण्यासाठी दोन तास रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत प्रवास करणाऱ्यांनी एकतर १२ वाजण्यापूर्वी किंवा २ वाजल्यानंतर प्रवास करावा.

याबाबत माहिती देताना महामार्ग पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद राहणार असल्याचे सांगितले. यापूर्वी २३ जुलै रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. दरम्यान महामार्गावर दगड आणि मातीचा ढीग आला. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी हा रस्ता वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा