मुंबई, पुण्याहून येणाऱ्या नागरिकांनी ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा : चव्हाण

पुरंदर दि.२८मे २०२०: शहरी भागांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असताना मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरातून अनेक लोक ग्रामीण भागाकडे येत आहेत. हे लोक गावाकडे आल्यानंतर आपल्या कुटुंबात जात आहेत. मात्र लोकांनी असे न करता गावात आल्यावर प्रथम ग्रामपंचायत किंवा प्राथमीक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.असे आवाहन नीरा ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी केले आहे.

बाहेरगावी किंवा कोरोनाबाधीत शहरातून   निरेमध्ये आल्यानंतर अशा नागरिकांना रयत संकुलातील महात्मा गांधी विद्यालयात विलगीकरणात  राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  नीरा ग्रामपंचायतच्यावतीने येथे विज,पाणी, निवासाची उपलब्ध  करून दिलेली आहे. लोकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. याबाबत ग्रामपंचायत काळजी घेत आहे. येथे आलेल्या लोकांना त्यांचे घरचे जेवण मिळणे शक्य नसेल तर येथील सामाजिक संस्था व नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने जेवण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी परस्पर घरी जाऊन रोग प्रसार होईल असे कृत्य करू नये. असे कळकळीचे आवाहन सदस्य अनिल चव्हाण यांनी केले आहे.
आजपर्यंत नीरा येथे पंचवीस लोकांना  संस्थात्मक क्वारंटाइन  करण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने काळजी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना घरीच विलगीकरण  करणे शक्य आहे, अशा लोकांना घरीच विलगीकरणात  ठेवण्यात  आले आहे.  मात्र असे करताना त्यांचा इतर लोकांशी संपर्क येणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे.

कोरोना रोगाचा प्रसार नीरा परिसरात होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. मात्र अशे वेळी बाहेरगावाहून आलेल्या लोकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले, शहरातुन आल्यावर लोकांनी पुन्हा आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची सोय करण्यात आली आहे.

नीरा बाजारपेठत गर्दी होऊ नये म्हणून पोलिस व ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहे. परिसरातील गावांनी नीरेत आल्यावर ग्रामपंचायतीने घालुन दिलेल्या वहातुकीच्या नियमांचे पालन करावे.अन्यथा अशा लोकांवर कडक करवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहूल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा