मुंबई शेअर बाजारामुळे रिलायन्स जिओ अडचणीत?

मुंबई : भारतातील अग्रगण्य कंपनी रिलायन्स जिओला मुंबई शेअर बाजाराचा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांत किरकोळ घसरुन होऊन ३८ अंकांची घसरण होऊन दिवसाअखेरीस तो ४१,६४२ वर स्थिरावला. त्यामुळे रिलायन्स जिओ अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९ अंकांची किरकोळ घसरण होऊन त्याने १२,२६२ चा स्तर गाठला. याचा फटका रिलायन्स जिओला बसला आहे. ही कंपनी आर्थिक संकटांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या इंधन शुद्धीकरण व्यवसायातील २० टक्के हिस्सा सौदी अरामको कंपनीस १५ अब्ज अमेरिकी डॉलरला विकण्याचा निर्णय घेतला आहे.
या घडामोडींचा परिणामही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाला असावा व त्यांनी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वधारलेला हा समभाग विकून कमाई करण्याचा मार्ग पत्करला. यामुळे रिलायन्सच्या समभाग मूल्यात १.७८ टक्क्यांची घसरण झाली असावी. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

अलीकडेच रिलायन्स जिओ कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केला आहे. मात्र जिओच्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली नाही. त्यामुळे प्लॅनच्या किंमती वाढवण्यापेक्षा सर्वात स्वस्त असा ४९ रुपयांच्या प्लॅन हटवला आहे. त्याची सुरुवातीची किंमत ७५ रुपये ठेवण्यात आली आहे. काही आठवड्यांपूर्वीच जिओने त्यांच्या युजर्ससाठी ऑल-इन-वन प्लॅन उपलब्ध करुन दिला होता. तर ७५ रुपयांचा प्लॅन हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

याबाबत टेलिकॉम टॉक यांच्या अहवालानुसार, ७५ रुपयांच्या प्लॅनसह ९९ रुपये, १५३, २९७ आणि ५९४ रुपयांसह दुसरे प्लॅन ही उपलब्ध आहेत. त्याचसोबत युजर्सला नॉन -जिओसाठी अतिरिक्त IUC टॉप-अप रिचार्ज करावा लागणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा