गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे औरंगाबादेत निधन

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे औरंगाबादेत निधन

औरंगाबाद दि.२९ मे २०२० : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व माजी आमदार बी एन देशमुख यांचे आज (शुक्रवारी) पहाटे औरंगाबाद येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी राज्यसभा सदस्य नरसिंहराव देशमुख यांचे ते पुत्र होत. मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असलेले व औरंगाबादमध्ये स्थायिक झालेले बी एन देशमुख उच्च न्यायालयात वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्नावर त्यांनी दिलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version