गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा नाशिक शहरात महिलेवर बिबट्याचा हल्ला

नाशिक शहरात महिलेवर बिबट्याचा हल्ला

नाशिक, दि.२९ मे २०२०: गेल्या महिना भरापासून नाशिकच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने आज सकाळच्या सुमारास नाशिक शहरात प्रवेश केला आहे. नाशिकच्या कॉलेज रोड इथल्या विसेमळा भागात बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला आहे.

नाशिकच्या लोहशिंगवे परिसरात गुरुवारी( दि.२८)रोजी बिबट्याने दर्शन दिले होते. तर आज सकाळपासूनच बिबट्याने शहरात आपली दहशत पसरवली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान बिबट्याचा कसून शोध घेतला जातो आहे.
शहरातल्या उच्चभ्रू वस्तीत बिबट्या शिरल्याने एकच धावपळ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सुदैवाने बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली नाही.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बिबट्याने महिलेच्या कानाजवळ पंजा मारून जखमी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version