मुंबईचे पहिले गृहमंत्री ते प्रसिद्ध गुजराती साहित्यिक : कन्हैयालाल मुन्शी

मुंबईचे पहिले गृहमंत्री म्हणून ओळखले जाणारे कन्हैयालाल मुन्शी हे एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, लेखक, पत्रकार, व शिक्षणतज्ज्ञ होते. ते पेशाने वकील होते व त्यानंतर ते साहित्य व राजकारणाकडे वळले.

गुजराती साहित्यात त्यांचे नाव खूप प्रसिद्ध आहे. भारतीय विद्या भवन ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था त्यांनी १९३८ साली स्थापन केली.
कन्हैयालाल मुन्शी यांचा जन्म ३० डिसेंबर १८८७ रोजी गुजरातमधील भरोच येथील उच्चशिक्षित ब्राह्मण कुटुंबात झाला. एक हुशार विद्यार्थी असलेल्या मुंशी यांनी पुढे चालून कायद्याचा अभ्यास केला. बॅचलर ऑफ लॉ नंतर त्यांनी मुंबई येथे सराव केला. पत्रकार म्हणूनही ते यशस्वी झाले.
मुंशी हे १९१५ मध्ये गांधीजींसोबत यंग इंडियाचे सह – संपादक झाले. त्यांनी इतरही अनेक मासिकांची संपादने केली.
गुजराती साहित्य परिषदेत त्यांना महत्त्वाचे स्थान मिळवले आणि १९३८ च्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या काही मित्रांसह भारतीय विद्या भवनची स्थापना केली.
हिंदीमधील ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरी आणि कथा लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी प्रेमचंद यांच्याबरोबर हंस या मासिक पत्रिकाची संपादन जबाबदारीही घेपार पाडली.
१९५२ ते १९५८ पर्यंत ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. वकील, मंत्री, कुलगुरू आणि राज्यपाल अशा महत्त्वाच्या पदांवर काम करत असताना त्यांनी ५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
यात कादंबऱ्या, कथा, नाटक, इतिहास, ललित कला इत्यादी विषयांचा समावेश आहे. १९५६ मध्ये त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले.दरम्यान, ८ फेब्रुवारी १९७१ रोजी कन्हैयालाल मुंशी यांचे निधन झाले. आणि एक साहित्यिक राजकीय युगाचा अंत झाला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा