गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई: माटुंग्याच्या जवळील सिग्नल व्यवस्थेत झालेल्या बिघाडामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याचे समजले आहे. झालेल्या या बिघाडामुळे येणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशीराने धावत आहेत. या सर्वांमध्ये सकाळी कामाला निघणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे तसेच मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप ही चालू आहे या सर्वांमध्ये प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.
अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील गाड्या उशिरा धावत आहेत. सिग्नल मधील बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे असे रेल्वेने सांगितले आहे परंतु गाड्या या ठरलेल्या वेळेच्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिरा धावत आहेत. मुंबईमध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या कामकाजावर ही परिणाम होऊन आणखी गाड्या लेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version