गोल पोस्ट राष्ट्रीय मुंबईतून १२ बांग्लादेशी घुसखोर ताब्यात

मुंबईतून १२ बांग्लादेशी घुसखोर ताब्यात

मुंबई : मुंबईतील महानगरात घुसखोरी करणाऱ्या बांग्लादेशीयांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.
या घुसखोरांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून १२ बांग्लादेदेशींना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काही बांग्लादेशी नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन करून भारतात घुसले व ते मुंबईमध्ये राहत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पूर्ण मुंबई शहर व उपनगरांमध्ये शोध घेतला.
पोलिसांना अंधेरीत काही बांग्लादेशी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईत १२ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version