महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ

जालना, १७ जानेवारी २०२४ : केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आज नूतन वसाहत व वाल्मिकी नगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते फीत कापून विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ करण्यात आला. या अभियानात उपस्थित सर्वांनी एकत्रित आपला संकल्प विकसित भारताची शपथ घेतली.

अभियानाच्या ठिकाणी भारत गॅसचे उज्वला योजना, आरोग्य विभागाचे सर्वांसाठी मोफत उपचार, आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, आयुषमान भारत, महानगरपालिकेचे हर घर जल योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आधार कार्ड, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आदी स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलद्वारे वेगवेगळ्या शासनाच्या योजनाची नोंदणी, आधार अपडेट, आयुष्मान भारत कार्ड काढून देणे, सर्व रोग निदान शिबीर आदी करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा